Widgets Magazine

अडीच वर्षाच्या चिमुकल्या 208 देशांची नावे तोंडपाठ

Aveer Pradip Jadhav
सामान्य घरातला असामान्य मुलगा, वय वर्षे अडीच. इतक्या कमी वयात सहा राष्ट्रीय विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्याचा एक विक्रम तर अनेकांना थक्क करणारा आहे. अवघ्या अडीच मिनिटांत तो 208 देशांची नावे पटापट सांगतो. महाराष्ट्रातील या अचाट आणि अफाट बुद्धिमत्ता असलेल्या चिमुकल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे.
गेल्याच महिन्यात अवीरने वेगवेगळ्या स्पर्धा जिंकून आपल्या नावे सहा विक्रम नोंदवले आहेत. नकाशामध्ये भारत कुठे आहे, हे शोधण्यासाठी उत्सुकता त्याला होती, तेव्हा नकाशा खरेदी करण्यासाठी त्याने आपल्याकडे हठ्ठ धरला होता. नकाशातील भारत शोधल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर झळकत होता.
काही दिवसांनंतर जगाच्या नकाशातील इतर देशांची नावेही अवीर ओळखू लागला, असेही त्याच्या आईने सांगितले. नकाशावरील 208 देशांची नावे तो अचूक सांगतो ती ही फक्त 2 मिनिट 55 सेकंदांत. इतकेच नव्हे तर ध्वज पाहून किंवा नकाशा पाहून तो देश ओळखणे, देशांच्या राजधानीची नावे झटक्यात सांगतो.


यावर अधिक वाचा :