बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2017 (10:08 IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 61 वा महापरिनिर्वाण दिन

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कात पोहोचले आहे. यंदा ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने शिवाजी पार्कात चिखल झाला आहे. तरीही भीमसैनिकांचा शिवाजी पार्ककडे येणारा ओघ मात्र सुरुच आहे.

दुसरीकडे महापालिकेतर्फे भीमसैनिकांसाठी मोठ्या सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत.मुंबईबाहेरुन आलेल्या अनुयायांची राहण्याची सोय यंदा शिवाजी पार्कमधील शेल्टरऐवजी महापालिकेच्या 70 शाळांमध्ये करण्यात आली आहे. तर सोयीसाठी शिवाजी पार्क परिसरात खासगी बस, बेस्ट बस सोडण्यात येत आहेत.