बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2017 (09:23 IST)

राहुल गांधींचा 'अध्यक्ष', फक्त औपचारिकता बाकी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा अध्यक्ष व्हायचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची वेळ सोमवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत होती, पण राहुल गांधी वगळता कोणत्याच काँग्रेस नेत्यानं अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. त्यामुळे आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे निश्चित झालं आहे.
 
त्याआधी राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. राहुल गांधींच्या अर्जावर माजी पंतप्रधान ड़ॉ मनमोहन सिंह आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत. याशिवाय राहुल यांच्या उमेदवारीला काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय.
 
काँग्रेसला राहुल गांधींच्या रुपात नवा अध्यक्ष मिळणार आहे. राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष घोषित करण्याची आता फक्त औपचारिकता बाकी आहे.