शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 18 मार्च 2020 (17:18 IST)

सावधानता बाळगा व घरातच राहा : सायना

कोरोनाव्हायरसाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने आपल्या चाहत्यांना ट्विटरद्वारे खास संदेश दिला आहे. अत्यंत सावधानता बाळगा आणि घरातच राहा. 
 
पुढच्या दोन आठवड्यांचा कालावधी हा भारतासाठी अत्यंत  नाजूक आणि कसोटीचा असणार आहे. इतर देशांनी कोरोनाबाबत कायम सावधानता बाळगली आणि कशाप्रकारे कोरोनाचा सामना केला ते नीट समजून घ्या आणि त्यानुसार स्वतःच्या परिसरात सावधानता बाळगा, असा संदेश सायनाने दिला आहे.