सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (15:09 IST)

Beed: सामूहिक बलात्काराने बीड हादरलं

rape
Beed: बीड जिल्हयात माजलगाव या ठिकाणी एका विधवा महिलावर सात जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
रिक्षेत विसरलेली पर्स देण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रूमवर बोलावून एका रिक्षा चालकाने तिच्यावर अत्याचार करत तिचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सात जणांनी 2014 पासून ते 2021 सात वर्षा पर्यंत आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडल्यामुळे बीड हादरलं आहे. 
 
परत तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत असल्यामुळे तिने पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यावर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.   

पीडित ने सांगितले की 2014 मध्ये प्रवास करताना तिची पर्स संदीप पिंपळे नावाच्या रिक्षा चालकाच्या रिक्षेत राहिली. संदीपने पर्स देण्याच्या बहाण्याने तिला एका खोलीवर बोलाविलें नंतर तिच्यावर अत्याचार करत तिचे व्हिडीओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर सतत अत्याचार केले.नंतर संदीप याने आपल्या नातेवाईकांशी संबंध करायला सांगितले नंतर त्यांच्या मित्रांनी देखील तिच्यावर आळीपाळीने  अत्याचार केला नंतर कंटाळून ती माजलगाव आली तरीही त्यांनी तिचा कडे शारीरिक सुखाची मागणी केली . सततच्या अत्याचाराला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेले सर्व सांगितले पोलिसांनी पीडित्याच्या  फिर्यादी वरून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  
 


Edited by - Priya Dixit