Widgets Magazine
Widgets Magazine

थेट कॅशियरच्या केबिनमधून 12 लाख रुपये लांबवले

शुक्रवार, 7 जुलै 2017 (12:42 IST)

bank of maharashatra
बेळगावमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमधून 12 लाख रुपये लांबवल्याची घटना किर्लोस्कर रोड शाखेत घडली. थेट कॅशियरच्या केबिनमध्ये प्रवेश करुन तिथल्या ड्रॉव्हरमधून रोकड लांबवली. एकूण पाच ते सहा जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे चोरटे तामिळनाडूचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
 

सकाळी बँकेचे व्यवहार सुरु झाले. त्यानंतर बँकेत आलेल्या चार ते पाच जणांनी, बँकेच्या सगळ्या कॉऊंटरवरील कर्मचाऱ्यांना माहिती विचारण्याच्या निमित्ताने बोलण्यात गुंतवून ठेवलं. नंतर कॅशियरचेही लक्ष विचलित केलं. त्यावेळी काऊंटरच्या आत गेलेल्या एकाने केबिनमधील ड्रॉव्हरमधून बारा लाखाची रोकड उचलली आणि पोबारा केला. अडीच तासांनंतर बारा लाख रुपये चोरट्यांनी लांबवल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. 
Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शहीद जवानाच्या वडीलांना मुलाच्या मृत्यबाबत संशय

भारत-चीन सीमेजवळ मे महिन्यात झालेल्या दुर्घटनेत शहीद झालेले सुखोई विमानातील पायलट एस. ...

news

भाजपामधील बाटगेच मोदी-मोदी करतात : सामना

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपावर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. मुंबई ...

news

अखेर लालू कायदेशीररीत्या अडचणीत, गुन्हे दाखल

चारा घोटाळा आणि इतर आर्थिक घोटाळ्यात गुंतलेल्या लालू प्रसाद यादव विरोधात अखेर कारवाईला ...

news

दहशतवादी बुरहानच्या मृत्यूला 1 वर्ष झाले तरी घाटीत आहे त्याच्या 'भूत'ची भिती!

हिजबुल कमांडर बुरहान वाणीच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर देखील तो काश्मीरमध्ये सुरक्षा ...

Widgets Magazine