Widgets Magazine
Widgets Magazine

बेळगाव महापौरपदी मराठी भाषिक संज्योत बांदेकर

बुधवार, 1 मार्च 2017 (17:02 IST)

belguam mayor

बेळगाव महापौरपदी  मराठी भाषिक संज्योत बांदेकर यांची निवड झाली. संज्योत बादेंकर यांनी 15 मतांनी विजय मिळवला. मराठी भाषिकात २२ नगरसेवकांचा एक आणि १० नगरसेवकांचा एक असे गट झाले होते . त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत काय होणार? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं.  पण काल हे दोन्ही गट एकत्र आल्यानं आजच्या निवडणुकीत संज्योत बांदेकर यांचा सहज विजय झाला. महापौर पदाचा उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार आमदार संभाजी पाटील यांना देण्यात आला होता.सुरुवातीला मराठी भाषिक गटातून महापौर पदासाठी संज्योत बांदेकर आणि मधुश्री पुजारी यांच्या नावाची चर्चा होती.  

अखेर संज्योत बांदेकर यांच्या पारड्यात वजन टाकण्यात आलं. बेळगाव महापालिकेत यंदा महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव होतं. तर उपमहापौर पद खुल्या प्रवर्गासाठी होतं. निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी प्रादेशिक आयुक्त एन. जयराम उपस्थित होते.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

निधी उपलब्ध होत नसल्याने सेल्फी पॉईंट बंद

मुंबईतील शिवाजीपार्क येथील कॉलेज तरुण-तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेला सेल्फी पॉईंट ...

news

निलम गोऱ्हेना धमकी देणाऱ्याला बेड्या

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे धमकी प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दिपककुमार गुप्ता(४०) ...

news

स्वाधीन क्षत्रिय यांनी घेतली राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त पदाची शपथ

राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय ...

news

सामनातून पुन्हा भाजपावर जहरी टीका

एका बाजूला मुंबईत युतीचा तिढा कायम असून, शिवसेना आपला महापौर करणार आहे. मात्र अश्या वेळी ...

Widgets Magazine