गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (14:41 IST)

Bhandara: अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला

भंडाराच्या तुमसर तालुक्यात बाम्हणी गावात एका तरुणावर अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला करण्याची घटना घडली. या हल्ल्यात 200 जण जखमी झाले.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

भंडाराच्या तुमसर तालुक्यात बाम्हणी गावातील एका स्मशानात अपघातात मृत्युमुखी झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्ययात्रा रविवारी दुपारी वैनगंगा नदीकाठी असलेल्या स्मशानात नेली असता त्याच वेळी मधमाशांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागले. सर्वत्र गोंधळ उडाला. काहींनी नदीपात्रात उडी घेत आपला जीव वाचवला.  
मधमाशांच्या हल्यात सुमारे 200 नागरिक जखमी झाले.नंतर जखमी नागरिकांनी मृतदेहावर  अंत्यसंस्कार केले. नंतर रुग्णालयात जाऊन उपचार केले. 
 
 
 
 Edited by - Priya Dixit