भंडारा : नवरा -बायकोची झोपेतच निर्घृण हत्या
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गोबरवाही येथे रात्री घरात झोपलेल्या नवरा-बायकोची निर्घृण हत्या करण्याचा धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. सुशील बोरकर (46)आणि त्यांची पत्नी हे गुरुवारी रात्री झोपायला आपल्या खोलीत गेले. बाजूच्या खोलीत त्यांची दोघे मुलं झोपले असून इतर कुटुंबीय देखील झोपले होते.
सकाळी सुशील यांच्या खोलीचं दार बऱ्याच वेळ उघडले नाही. तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दार उघडल्यावर बोरकर पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले असून त्यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. शेजारच्यांनी तातडीनं पोलिसांना कळविले.पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit