शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (22:09 IST)

राज ठाकरे यांना भोंगा वाद प्रकरणात गृहमंत्र्यांकडून सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण

dilip valse patil raj
आगामी काळात कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी काय करावं लागेल, याबाबतचा प्लान त्यांनी आज माझ्यासोबत मांडला आहे,' अशी माहिती वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.  
 
स्पीकरला हटवण्याची जबाबदारी सरकारची नाही. पोलिसांच्या परवानगीने लाऊड ​​स्पीकर लावावेत, असे आवाहन गृहमंत्री वळसे-पाटील यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नियम राज्य सरकारच्या नियमांनुसार व्हायला हवेत. सरकारने काय करावे हा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.
 
दरम्यान, राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभेचा टीझर रिलीज झाला झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हा टीझर रिलीज केलाय.  राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभेला परवानगी देऊ नका, वंचितसह पाच संघटनांचं पोलिसांना पत्र दिले आहे. सभा घेण्यावर मनसे ठाम आहे. मशिदींवरील भोग्यांनंतर मनसेच्या रडारवर आता प्रार्थनास्थळांमधील सीसीटीव्ही आले आहेत. मदिरांमध्ये सीसीटीव्ही बसवले जातात तर मग मशिदींमध्ये सीसीटीव्ही का बसवले जात नाहीत असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांनी थेट ट्विट करून ही याबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जवळपास सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. परंतु मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का? असा प्रश्न असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.