सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (21:56 IST)

बीएचआर प्रकरण : सुनील झंवरचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला

राज्यात गाजलेल्या बीएचआर अपहार प्रकरणी कोठडीत असलेला मुख्य संशयीत सुनील झंवरला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ऑगस्ट महिन्यात झंवरला नाशिक येथून अटक केली होती.
 
जळगाव जिल्ह्यातील बीएचआर प्रकरणी दाखल गुन्ह्यात मुख्य संशयीत म्हणून सुनील झंवरला सहा महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. बीएचआर संस्थेवर नियुक्त अवसायक जितेंद्र कंडारेच्या कार्यकाळात घडलेल्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य संशयित सुनील झंवर याला अटक करण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला दि.१० ऑगस्ट २०२१ रोजी नाशिक येथून अटक केली होती.
 
सुनील झंवरला अटक झाल्यानंतर पुणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या युक्तिवादानंतर त्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन अटीशर्तींसह सुनील झंवरला सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुनील झंवर यांच्या निकटवर्तियांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.