गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (19:22 IST)

वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

eknath shinde
यंदा तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भावानंतर वारकरी बांधव आणि भाविक आपल्या लाडक्या विठ्ठल आणि रखुमाईच्या भेटीसाठी त्यांच्या दर्शनासाठी आतुर आहेत. यंदा कोरोनाचे निर्बंध काढून आषाढीच्या वारीला करण्याची परवानगी देण्यात आली आहे.आषाढी वारीच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुराच्या दिशेने निघाले आहे. राज्यात राजकारणात मोठी उलाढाल बघायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी पंढरपुरात विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्याचा मान राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी साठी पंढरपूर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांचा टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकरींच्या वाहनांना स्टिकर्स देऊन त्यांच्या वाहनांची नोंद करावी आणि त्यांच्या वाहनांचा टोल माफ करावा, त्यांच्या स्नानाची आणि राहण्याची व्यवस्था चोख व्हावी स्वच्छता,आणि सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
त्यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोल फ्री करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि वारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या  4700 बस सोडण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.