Widgets Magazine
Widgets Magazine

भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना मारहाण

makrand narvekar
Last Modified बुधवार, 5 जुलै 2017 (17:17 IST)

मुंबई पालिकेच्या सभागृहातील जीएसटीनंतरचा धनादेश सुपूर्द करण्याचा शिवसेना आणि भाजपचा कार्यक्रमात नगरसेवकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना शिवसेनेच्या नगरसेविकांनी मारहाण केली. पालिका सभागृहाच्या लॉबीमध्ये ही मारहाण करण्यात आली.

Widgets Magazine
दुसरीकडे
नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा दावा, शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला. मी बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढले नाहीत. सभागृह सुरु होण्याच्या आधीच शिवसेना नगरसेविकांनी मारहाण केली, असा प्रतिदावा मकरंद नार्वेकर यांनी केला. तर नगरसेवकाला मारहाण करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेवक मनोज कोटक यांनी दिली.


Widgets Magazine

यावर अधिक वाचा :