शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (08:04 IST)

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार

देगलूर विधानसभेची ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार असून आम्ही त्याची व्यूवहरचना आखली आहे. ७ ऑक्टोबर रोजी आम्ही निवडणूक अर्ज भरू, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. देगलूर पोटनिवडणुकीसाठी आमचे सर्वेक्षण झाले आहे. निवडणूक लढवण्यासाठी १२ जणांची नावे पुढे आली आहेत. त्यात लिंगायत समाजाच्या स्वामींचेही नाव आहे. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून ४ तारखेलाच आम्ही उमेदवाराचे नाव जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येत्या २ ऑक्टोबरपासून पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते विदर्भातील पूरस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर मराठवाड्यातील परिस्थितीची पाहणी करतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.