शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (12:15 IST)

दहावी बारावी पेपरवर बोर्डाचा निर्णय

इयत्ता दहावी, इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 10 मिनिटांचा अधिक वेळ वाढवून मिळणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. हा निर्णय राज्य शिक्षण मंडळान घेतला आहे. या पूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या पूर्वी 10 मिनिटं आधी प्रश्न पत्रिका दिली जात होती. आता वेळेवर प्रश्न पत्रिका देण्यात येणार आहे. 
 
इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता 10 वी बोर्डाची लेखी परीक्षा  1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे तर  इयत्ता 12 वी ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 या कालावधीत होणार अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे कडून प्रसिद्ध करण्यात आपले आहे. 
 
मंडळाने सांगितले आहे की  संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी सर्व माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांनाछापील स्वरूपात दिले जाणारे वेळापत्रक अंतिम आहे. विद्यार्थ्यांनी त्याला अनुसरून परीक्षा द्यावी. इतर छापील वेळापत्रक, सोशल मीडियावर व्हाट्सअप वर व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.  
 
 Edited by - Priya Dixit