शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बोटॅनिकल गार्डनची तोडफोड

अगदीच काही दिवसापूर्वी उद्घाटन झालेल्या नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमध्ये विनातिकीट घुसलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तोडफोड केल्याची घटना  घडली आहे. याच लेझर शो दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे निमित्त करून १५ ते २० गुंडांनी गोंधळ सुरु करत तिकीट खिडकीजवळ तोडफोड केली असून तेथील वनसेवकांना देखील मारहाण केली आहे. सुदैवाने यात लेझर शो चे आणि लाईट्सचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.
येथे कामाला असलेल्या कर्मचारी नुसार काही गुंड या ठिकाणी आले आणि शो बंद पडला म्हणून आमचे पैसे परत करा  तिकीट आत सोडा असे म्हणू लागले घाबरलेल्या कर्मचाऱ्यांन पळून गेले आणि वनात जाऊन लपले तर येथील या लोकांनी रस्त्यावरील डीवायडर सुद्धा फोडले आहे सुदैवाने आतील शोला काही नुकसान झाले नाही. पळून गेलेले कर्मचारी पोलीस घटना स्थळी पोहोचले आणि तेव्हा कर्मचारी या ठिकाणी आले आहेत.
 
नेहरू गार्डन अशी ओळख असलेल्या या जागेचे नुकतेच टाटा ट्रस्टच्या मदतीने नुतनीकरण नुतनीकरण झाले असून महानगर पालिकेकडून याची देखभाल केली जात आहे. अत्यंत उत्तमप्रकारे साकारलेल्या या गार्डनमध्ये लेझर शो सह सायकल ट्रॅक आणि अनेक गोष्टी साकारण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या बोटॅनिकल गार्डनचे उद्घाटन अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी पुढील काही दिवसात स्वतः रतन टाटा यांना हे बोटॅनिकल गार्डन बघण्यास घेऊन येण्याची इच्छा व्यक्त केली होती.
 
उद्घाटन करताना हा अद्भुत प्रकल्प नाशिककरांनाच सांभाळायचा आहे असे आवाहन राज ठाकरे यांच्यासह नाना पाटेकर, भारत जाधव यांनीही केले होते मात्र उद्घाटनानंतर काहीच दिवसात नासधूस करण्यात आली आहे. विनातिकीट या लेझर शोमध्ये घुसलेल्या या गुंडांनी प्रचंड तोडफोड केली असून तेथील वनसेवकांना देखील मारहाण केली आहे.पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून कारवाई सुरु केली आहे.