मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (13:14 IST)

हिंगोली : BSF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटनेत BSF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. अरुण सखाराम कवाने हे गुजरातमध्ये भुज मुंद्रा येथे बीएसएफ बटालियन १८ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार 23 नोव्हेंबर रोजी जवानने हे धक्कादायक पाऊल उचललं. शहरातील आदर्श कॉलेज जवळील स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण कवाने यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.
 
अरुण यांनी १९९९ मध्ये त्यांनी बीएसएफ फोर्स जॉईन केली होती. अरुण यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे.