मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 (16:56 IST)

12 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, 3 प्रेग्नेंट, 11 अरेस्ट

महाराष्ट्राच्या बुलढाणा येथे 12 अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. या मुली बोर्डिंग शाळेत शिकणार्‍या आहे. गुरुवारी पोलिसाने 11 आरोपींना अटक केली. यात 7 शिक्षक, हेडमास्तरासह शाळेतील स्टाफ सामील आहे. सर्व आरोपी निनाधि आश्रमाशी जुळलेले आहे. काही महिन्यांपासून बलात्काराचा शिकार होत असलेल्यांमधून 3 मुली गर्भवती आहे.
 
मीडिया रिर्पोट्सप्रमाणे या तिन्ही मुली दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी जळगाव येथे परतल्या होत्या. त्या दरम्यान पोटात वेदना होत असल्याने तपासणी केल्यावर त्या गर्भवती असल्याची बातमी कळली.
 
पोलिसांनी सर्व मुलींना अकोला येथील एका रूग्णालयात भरती केले आहे. त्या 12 ते 14 वयातील आहे.
 
निनाधि आश्रम एक सरकारी शाळा आहे. ही शाळा पहिली ते दहावींपर्यंत असून यात 300 हून अधिक विद्यार्थी आहेत. ही शाळा बुलढाणा येथील आदिवासी क्षेत्र हिवरखेड येथे आहे जिथे गरीब आदिवासी मुलांना बोर्डिंगमध्ये ठेवून शिक्षण दिलं जातं. पोलिसांप्रमाणे सध्या एका प्रकरणात तक्रार नोंदवण्यात आली आहे. परंतू स्थानिक लोकांप्रमाणे संख्या अधिक आहे.
 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की ही घटना आम्ही गंभीरतेने घेतली असून आरोपींना अटक केली गेली आहे.
 
महाराष्ट्राचे डीजीपी सतीश माथुर यांनी म्हटले की एका मुलीच्या सूचनेवर विशेष टीम गठित करून यावर काम होत आहे. यात मुख्य आरोपी इत्तू सिंग आहे जो अवैध रूपाने तिथे राहत असून इतर लोकं त्याची मदत करायचे. या प्रकरणाची तपासणीसाठी 6 लोकांची एसआयटी गठित करण्यात आली असून त्यात 2 महिला सामील आहेत.