मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (16:25 IST)

आर्वीमध्ये नाना पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथील जाहीर सभेनंतर जनतेशी संवाद साधताना “मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो” असे आक्षेपार्ह विधान केले. त्याचे प्रतिसाद आर्वी विधानसभेत उमटले. आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यासह मोर्चा काढत नाना पटोलेंच्या असंस्कृत, असंविधानिक विधानाचा तिव्र निषेध करत पोलीस ठाणे आर्वी येथे तक्रार नोंदवली आहे.
 
आमदार दादाराव केचे यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, आरोपींनी दिलेल्या व्यक्तव्यामुळे आणि उघड धमकी मुळे देशाच्या पंतप्रधानांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आरोपीच्या या वक्तव्यामुळे पुढे जाऊन कोणतीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता असुन देशातील वातावरण दूषित होण्याची शक्यता असुन भाजपाचा आमदार असल्याने मला सुद्धा जिवाला धोका वाटत आहे. त्यामुळे आरोपी विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासाठी नाना पटोले विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली आहे. या निषेध मोर्चाला भारतीय जनता पक्षाचे नेते, नगरपरिषद आर्वीचे नगरसेवक, नगरसेविका तथा पदाधिकारी तसेच जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.