शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:28 IST)

पण हा दिलासा नाहीये. इथे फक्त युक्तिवादाचं कोर्ट बदललं आहे. : आदित्य ठाकरे

aditya thackeray
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे.मी बघत होतो की काही ठिकाणी गद्दारांना दिलासा वगैरे म्हणत होते. पण हा दिलासा नाहीये. इथे फक्त युक्तिवादाचं कोर्ट बदललं आहे. आत्तापर्यंत जे सर्वोच्च न्यायालयात होत होतं, ते आता निवडणूक आयोगासमोर होणार आहे. ठीक आहे, तिथे युक्तिवाद सुरू राहील. सगळं काही जनतेच्या समोर होत आहे. हा युक्तिवाद फक्त शिवसेनेसाठी नाही तर देशातल्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी महत्त्वाचा आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
 
“निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही सत्तेच्या बाजूने आहोत. विजयादशमीला सत्याचा विजय झाला तसाच शिवसेनेचाही विजय होणार”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.