गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (10:31 IST)

भाजपाच्या पंकजा मुंढे सह निवडणुकीत पक्ष सोडून गेले त्यां भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जोरदार धक्का

विधानसभा निवडणुकी आधि अनेक पक्षातील नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. यात कोन्ग्रेस, राष्ट्रवादी यांना जबर न्ध्क्का बसला होता. मात्र आता शिवसेने सोबत कोन्ग्रेस व राष्ट्रवादीने सरकार बनवले आहे. यातूनच आता पक्ष जे सोडून गेले त्या नेत्यांना मुख्यमंत्री यांच्या निर्णयाने जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्या साखर कारख्यानांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली 310 कोटी रुपयांची बँक हमी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने रद्दबाद ठरवली आहे. 
 
राज्यावर सध्या  6.7 लाख कोटींच्या कर्ज आहे, त्यामुळे  राज्याचा गाडा चालवताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठ्या अडचणीं येत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारने या चार नेत्यांशी संबंधीत साखर कारखान्यांना 310 कोटी रुपयांची बँक हमी दिली, तर राज्याच्या आर्थिक परिस्थितीच्या आढावा बैठकीत ठाकरे यांनी ही हमी रद्द ठरवली आहे. 
 
राजकीय हेतूने या कारखान्यांना बँक हमी दिल्याचं समोर आले आहे, त्यामुळे ही बँक हमी रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन आणि फडणवीस यांचा समृद्धी महामाकर्गाच्या कामावर बंदी आणण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने कोणतेही प्रकल्प रद्द केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ज्या प्रकल्पांची खरेच गरज आहे अशा प्रकल्पांचेच काम सुरू ठेवणार असल्य़ाचे म्हटले आहे. 
 
मात्र या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन सरकारने बँक हमी , खेळत्या भांडवलापोटी मदत जाहीर केली होती. त्यामध्ये  पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना यांना ही हमी देण्यात आली होती.