गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (16:20 IST)

सावधान: क्रेडीट कार्ड धारकाला हे आमिष दाखवून तब्बल ४० हजार रुपयांची फसवणूक

सायबर क्राईमच्या प्रकारात वाढ झाली असून आता हे गुन्हेगार वेगळ्या पद्धतीने फसवणूक करत आहेत.एका क्रेडिट कार्डधारक ग्राहकाला लिमिट वाढवून देण्याचे आमिष दाखवत ४० हजारांना ऑनलाइन गंडा घातला आहे.याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि भाऊसाहेब आव्हाड रा. श्रीरामनगर, आडगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनोळखी नंबरहून फोन आला. एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत कार्डचे लिमिट वाढवण्याचे सांगितले. कार्डची माहिती घेतली मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर दिल्यानंतर ४०,००० रुपये काढून घेतल्याची तक्रार आव्हाड यांनी दिली. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.