शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 एप्रिल 2017 (13:42 IST)

गर्मीचा कर्फ्यू एप्रिलमध्येच जून सारखी गर्मी, चंद्रपूरचा पारा 46 डिग्री पार

सूर्याचा प्रकोप या वेळेस उत्तर आणि मध्य भारतात बघायला मिळत आहे, ज्यामुळे बर्‍याच भाग लू च्या लपेटमध्ये आले आहे.   दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, जम्मू, हिमाचल, उत्तर प्रदेशात लू सुरू आहे. गर्मीने दिल्लीत एप्रिल मध्येच पाच वर्षांचा रेकार्ड मोडला आहे. दिल्लीचा अधिकतम तापमान 44.4 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे.  
 
सर्वात जास्त तापत आहे महाराष्ट्राचे चंद्रपूर
सूर्याचा सर्वात जास्त ताप महाराष्ट्राच्या चंद्रपूरमध्ये आहे, तेथील सर्वाधिक तापमान 46.2 डिग्री सेल्सियस आहे. राजस्थानचे   गंगानगर 45.8, नागपूर 45.3, ब्रह्मपुरी आणि वर्धा 45.2, एमपीचे खजुराहो 45.1, नौगोंग 44.9, ग्वालियर 44.9, यूपीतील     आग्राचा 44.9 आणि दतिया 44.9 डिग्री सेल्सियस आहे.  
 
दिल्लीच्या लोकांना देखील गर्मीने हैराण केले  
दिल्लीच्या लोकांना आजही गर्मीने हैराण केले आहे. आजचा सर्वाधिक तापमान 44 डिग्री सेल्सियस राहण्याचा अनुमान आहे. लखनौचा देखील सर्वाधिक तापमान 44 डिग्री राहू शकतो, रात्री देखील लोक गर्मीमुळे त्रस्त राहू शकतात.  
 
पाऊस न झाल्याने गर्मी वाढत आहे. येणार्‍या दिवसांमध्ये दक्षिणी गुजरात, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तरी तेलंगाणा  आणि दक्षिण आंध्र प्रदेशात गर्मी वाढण्याचे संकेत आहे.  
 
महत्त्वाचे म्हणजे लू मुळे 30 मार्चपर्यंत महाराष्ट्रात 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.