Widgets Magazine
Widgets Magazine

भुजबळांकडून अंजली दमानियांना अब्रू नुकसानीची नोटीस

गुरूवार, 18 मे 2017 (23:02 IST)

chagan bhujabal

छगन भुजबळांकडून अंजली दमानियांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. याआधी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची ऑर्थर रोड तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.  दमानिया यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं पत्रातून छगन भुजबळ यांनी  म्हटलं होतं.  भुजबळ यांनी करागृहातून पत्र लिहून दमानिया यांचे सगळे आरोप फेटाळले होते.  गेल्या 14 महिन्यांपेक्षा अधिक काळ आम्ही तुरूंगात आहोत. पण आम्हाला जामीन मिळू नये, इस्पितळात ट्रीटमेंट मिळू नये यासाठी ठराविक काळाने आमच्याविरोधात खोट्या खोळसाड बातम्या पसरवल्या जात आहेत जणू आमच्या जीवावरच आमचे विरोधक उठले असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. नियमानुसारच घरचा डबा मिळत असल्याचा खुलासा भुजबळांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

जुना पदपूल कोसळला ,५० हून अधिक लोक पडल्याची भीती

दक्षिण गोव्यात धारबांदोडा तालुक्यात सावर्डे गाव येथे वापर नसणारा जुना पदपूल कोसळून ...

news

येत्या २९ मेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांचा दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ मेपासून तीन देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी ...

news

मुंबई-शिर्डी विमान सेवेला मंजुरी

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत मुंबई-शिर्डी विमान सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली ...

news

वर्सोवा ब्रिज झाला खुला

मुंबई-अहमदाबाद महामार्ग 8 वर घोडबंदर जवळ असलेल्या जुन्या वर्सोवा ब्रिजच्या गर्डरला ...

Widgets Magazine