राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आधीच हैराण झालेले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. असं असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. आज पासून पुढील तीन दिवस मुंबई पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अदांजानुसार पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात ढगाळ हवामानाची (Cloudy weather) तर उद्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अदांजानुसार, उद्या मुंबई, पालघर, ठाणे, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा ऑरेंज अलर्ट मध्ये समावेश आहे. तर राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाला सुरुवातही झालेली पाहायला मिळाली आहे.