1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (09:14 IST)

मराठवाडा, कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तसेच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबईत जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं पावसाचा पुढील चार दिवसांसाठी अंदाज जारी केला आहे. कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड येथे निर्माण झाल्याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत.
 
हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, रायगड, जळगाव, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अकोला, अमरावती, परभणी, वाशिम, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.