शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेतर्‍यांना जिल्हा बँकनी कर्जाने पैसे दिलेच पाहिजे: पाटील

कर्जमाफीची घोषणा झाल्यावर नवीन कर्ज रक्कम वाटप करण्यात जिल्हा बँकांनी हात आखडता घेतला आहे. परंतु राज्यातील जिल्हा बँकनी कर्जाने शेतकऱ्यांना पैसे दिलेच पाहिजेत असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, सहकार कायद्यानुसार जिल्हा बैंकना पैसे देने बंधनकारक असून कलम 79 अ नुसार जिल्हा बैंकना आदेश या पूर्वीच देण्यात आले आहेत. त्यामुळं बँकांनी शेतकऱ्याला कर्ज देणं बंधनकारक आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नवर कुणी राजकरण करु नये असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.