शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (17:09 IST)

अपघातामधून चंद्रकांत पाटील बचावले

पुण्यात कोथरूड  येथील चांदणी चौक येथील कामाची पाहणी  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरुडचे आमदार चंद्रांकत पाटील यांनी केली. मात्र यावेळी झालेल्या एका अपघातामधून चंद्रकांत पाटील बचावले. चांदणी चौक येथील उतारावर पत्रकांशी संवाद सुरु असतानाच तीव्र उतारावरुन येणाऱ्या एका चालकाची दुचाकी तेथे जमा झालेल्या गर्दीवर आदळली. 
 
सुदैवाने कार्यकर्ते आजूबाजूला असल्याने चंद्रकांत पाटील यांना काही झालं नाही. दुचाकीस्वाराने मद्यपान केल्याच्या शंकेवरुन कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना थांबवलं. “थांबा त्याला मारु नका,” असं म्हणथ चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना थांबवलं आणि त्यांनी दुचाकीस्वाराची चौकशी केली. तुला लागलं नाही ना असं चंद्रकांत पाटील यांनी दुचाकीस्वाराला विचारलं. चंद्रकांत पाटलांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांनी दुचाकीस्वाराला तेथून जाऊ दिलं.