शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (15:21 IST)

छगन भुजबळ जसलोक रूग्णालयात दाखल

Chhagan Bhujbal
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना अचानक छातीत दुखू लागल्याने मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोर्टाच्या दिशेने जात असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांच्यावर डॉक्टर मेहता हे छगन भुजबळ यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे. त्यांना जास्त त्रास झाला तर लीलावती रूग्णालयातही त्यांना हलवण्यात येऊ शकते अशीही शक्यता आहे.