छगन भुजबळ हेच शाहू महाराजांचे खरे वारसदार-संभाजी महाराज
छगन भुजबळ हेच शाहू महाराज यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत, असे गौरवोद्गार खासदार छत्रपती संभाजी छत्रपती यांनी काढले. भुजबळ ज्येष्ठे नेते असून ओबीसींचं नेतृत्व करत आहेत.
"भुजबळ हे शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार घेऊन समतेचा लढा लढत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई सुरू आहे. मी नुसता वंशज छत्रपती घराण्याचा वशंज आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारावर माझी वाटचालही सुरू आहे. पण छगन भुजबळ हेच शाहू महाराज यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत", असं संभाजी छत्रपती म्हणाले.
खासदार संभाजी छत्रपती हे आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.