सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (10:32 IST)

‘सरकार पडेल असं म्हणणं म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न’

uddhav shinde
“सरकार पडेल असं म्हणणं म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे,” असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना उत्तर दिलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “आमचे सरकार तीव्र गतीने काम करणारे आहे. त्यामुळे काहींना पोटशूळ उठत आहे. म्हणूनच राज्यातील सरकार पडणार, अशा वावड्या वारंवार उठवल्या जात आहे. स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी हे केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.”

“आम्ही 50 खोके घेणारे नाही, तर विकासासाठी 200 खोके देणारे आहोत,” या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले.
 
तसेच, समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी दरम्यान काम पूर्ण झाले आहे. सर्वांचा आग्रह आहे की, समृद्धी महामार्ग नागपूरपासून पुढे भंडारा आणि गडचिरोलीपर्यंत आला पाहिजे. यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Published By- Priya Dixit