रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (17:48 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांना महत्वाच्या सूचना दिल्या

मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडियो कॉन्फरसिंग द्वारे टास्क फोर्स मधील डॉक्टरांना उपचार पद्धती विषयी मार्गदर्शन दिले.त्यांनी तीन दिवसा पूर्वी देखील मुंबईतील डॉक्टरांशी संवाद साधले होते . या मध्ये सुमारे 1000 डॉक्टरांचा सहभाग होता. 
मुख्यमंत्रीनी डॉक्टरांना येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज होण्यास सांगितले तसेच त्यांनी डॉक्टर्सच्या कारकिर्दी बद्दल कौतुक देखील केले. सध्या डॉक्टर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे ही त्यांनी सांगितले. फॅमिली डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना योग्य ती मदत करून औषधोपचार करावे तसेच होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णाकडे देखील जातीने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. या काळात रुग्ण मानसिक दृष्टया खचलेला असतो त्या साठी त्यांना मानसिक आधार देणे देखील महत्त्वाचे आहे. तब्बेत गंभीर होण्याच्या वेळी त्याला वेळीच रुग्णालयात दाखल करणे सहज शक्य होते. 
कोविड उपचार केंद्रात देखील अत्यावश्यक सेवा द्या असे आव्हान देखील त्यांनी केले.या वेळी तज्ज्ञ डॉक्टर्सनी शंकेचे निरसन आणि योग्य मार्गदर्शन देखील केले. त्यांनी रुग्णांची काळजी कशी घ्यावी, वॉक टेस्ट आणि त्याचे महत्त्व  ऑक्सिजन की गरज,व्हेंटिलेटर वरील रुग्णांची कशी काळजी घ्यावी, रेडिसीवीर कधी आणि किती द्यावे, सिटी स्कॅन कधी आणि का आवश्यक आहे , कोविड सेंटर मध्ये रुग्णांची ऑक्सिजन पातळी ची धोकादायक स्थिती कधी होते अशा महत्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन केले.
सध्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा वेळी लहान मुलांची योग्य काळजी कशी घ्यावी या संदर्भात देखील  माहिती दिली गेली.