मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (17:45 IST)

राज्यात मुख्यमंत्री होणार तो शिवसेनेचा, कॉंग्रेस कडून स्पष्ट

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अजून काही संपताना दिसत नाहीये. रोज प्रत्येक पक्षाचा नेता एक विधान करत आहे. त्यामुळे अजूनही राज्यातील सरकार स्थापन झाले नसल्याने अनेक चर्चना उधान आले आहे. यातच आता कॉंग्रेस नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे.  “शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाला असून,  राज्यातील नेत्यांचं याबद्दल  एकमत झाले  आहे. हा पूर्ण  ड्राफ्ट लवकरच हायकमांडकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार नागपूर येथे दिली आहे. एका खासगी मराठी वाहिनी सोबत बोलतांना त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 
 
त्मयांच्हाया नुसार शिवसेना आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार आहे. याबद्दल आम्हाला आनंद झाला  आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. तर यातील अंतिम निर्णय हा  महासेनाआघाडीच्या मसुद्याबाबत दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी  घेणार आहेत. हायकमांड मसुद्यात काय बदल करायचे असेल त्या सूचना देतील. चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ, असं वडेट्टीवारांनी सांगितले आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस कडून कोणताही नवीन प्रस्ताव नाही असे दिसते आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे चित्र आहे. 
 
मुख्यमंत्री शिवसेनेचाच
सरकार बनवायला वेळ लागणार नाही, पण स्थिर सरकार हवं ही आमची भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका ही किमान समान कार्यक्रमाबाबत एकमत यासाठी आहे. ते एकमत झालं आहे.  मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. भाजपने शब्द फिरवल्याने शिवसेनेने काडीमोड घेतला.