बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (16:33 IST)

चॉकलेटने घेतला चिमुकलीचा जीव

litle gir
साताऱ्यातील कर्मवरीरनगरमध्ये एक वर्षाच्या चिमुकलीचा चॉकलेट घशात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेने शहर परिसर हेलावला आहे. 
 
 शर्वरी सुधीर जाधव असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ती चिमुकली रविवारी लहानग्यांसोबत खेळत होती. यावेळी तिच्या मैत्रिणीने शर्वरीला खाण्यासाठी जेली चॉकलेट दिले. 
 
 शर्वरी ते चॉकलेट खाऊ लागली. खाता खाता चॉकलेट तिच्या घशात अडकले. त्यामुळे ती मोठ्याने खोकू लागली. काही क्षणातच ती बेशुद्ध पडली. हा प्रकार शर्वरीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शर्वरीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दवाखान्यात आणल्याने शर्वरीला काही होणार नाही, असे तिच्या आईला वाटले. प्रत्यक्षात डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मृत झाल्याचे समोर आले. हे समजताच कुटुंबातील लोक हादरुन गेले. 
 
 चॉकलेट घशात अडकल्याचं लक्षात आल्यानंतर आईने मुलीला रुग्णालयात नेलं पण त्याआधीच मुलीचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या मुलीचं नाव शर्वरी सुधीर जाधव असं आहे. 
Edited by : Smita Joshi