शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (11:37 IST)

मद्यपी पोलिसांकडून नागरिकाला मारहाण

पोलिसांच्या नावाला काळिमा फासणारी घटना नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या डी.के .नगर पोलीस ठाण्यात घडली आहे. मंगळवारी रात्री या ठाण्यात पोलिसांची मद्यपार्टी रंगली होती. त्यावेळी एक 50 ते 60 वर्षातील वयोगटाचे गृहस्थ डी के नगर परिसरातील उद्यानात गोंगाट करत असलेल्या काही टवाळखोरांची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, त्या पोलीस ठाण्यात पोलिसांची ओली पार्टी सुरु होती. त्या पोलीस ठाण्यात 5 ते 6 पोलीस कर्मचारी मद्यपानात रंगले होते. त्यांनी तक्रार करण्यासाठी गेलेल्या गृहस्थांना आत बोलावून लाईट बंद करून मारहाण केली. असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तिथल्या रहिवाशांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मद्यपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत  आहे. घटनेची माहिती समजतातच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीकारी घटनस्थळी पोहोचले. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला