रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जून 2024 (18:53 IST)

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला

varsha gaikwad
काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी आमदारकीचा राजीनामा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कडे दिला. वर्षा गायकवाड या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून उभ्या होत्या त्यांनी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव केला.आता धारावी मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपला आमदारकीचा राजीनामा राहुल नार्वेकरांकडे दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीत विजयानंतर आमदारांना राजीनामा द्यावा लागतो. काँग्रेसच्या अनेक आमदारांना निवडणुकीत विजयानंतर आमदारकीचा राजीनामा दिला. आज वर्षा गायकवाड यांनी देखील आपला राजीनामा दिला. आता त्या खासदार म्हणून दिल्लीला जाणार. 

 या पूर्वी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले. 
Edited by - Priya Dixit