शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (09:13 IST)

साईभक्तांना दिलासा; ऑफलाईन पासेस होणार सुरू !

कोरोनाचा आलेख खालावल्याने साईदर्शनासाठी 15 हजार ऑनलाईन आणि 10 ऑफलाईन अशी एकून 25 हजार भाविकांना साईमंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे साईभक्तांना दिलासा मिळणार आहे.
 
8 नोव्हेंबर रोजी साईसंस्थाननं भक्तांकरिता ऑफलाईन दर्शन पास, लाडू प्रसाद व श्रीसाई प्रसादालय सुरु करण्याबाबत विनंती पत्र जिल्हा प्रशासन देवू केले होते. त्यानंतर आज यावर निर्णय होवून श्रीसाईबाबा संस्थानला कोव्हीड सुसंगत वर्तनचे पालन करुन दैनंदिन 10,000 भक्तांना ऑफलाईन दर्शनासाठी मुभा देण्यात आली आहे.
त्यामुळे यापुढे साईदर्शनासाठी 15 हजार ऑनलाईन आणि 10 ऑफलाईन अशी एकून 25 हजार भाविकांना साईमंदिरात प्रवेश दिला जाणार आहे . मात्र यादरम्यान कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून भाविकांनी शक्यतो ऑनलाईन दर्शन पासेस बुकींग करुनचं शिर्डीत यावं असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या वतीनं करण्यात आले आहे.