सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 19 जानेवारी 2021 (21:22 IST)

उदयनराजे भोसले यांचे वादग्रस्त विधान

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ग्रेड सेपरेटरच्या वादाबाबत बोलताना उदयनराजेंनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
 
ग्रेड सेपरेटरच्या वादावर बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले की, हा मुद्दा सोडवण्यासाठी वेळ लागणारच. मूल होण्यासाठीही नऊ महिने लागतात. त्यासाठी त्रास सहन करावा लागतो. हा तर ग्रेड सेपरेटरचा विषय आहे आहे. त्यासाठी वेळ लागेलच.
 
आता मंत्र्यांनी उदघाटन करावं का हा विषय आहे. तर मंत्री असले तरी तेसुद्धा आमदार, खासदार असतात. मीसुद्धा खासदार आहे. मी असा तसा खासदार नाही तर खाज असलेला खासदार आहे, असे विधान उदयनराजे यांनी केले आहे.