गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (16:06 IST)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर

राज्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कोण असणार यासाठी राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. 
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी विजय वडेट्टीवार हे इच्छुक आहेत. तसे त्यांनी बोलूनही दाखवले होते. दरम्यान, या पदासाठी राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे नाव पुढे आले होते. तसेच राज्यातील मंत्री विजय वडेट्टीवार यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र गुजरात विधानसभा निवडणुका लक्षात घेता तिथले प्रभारी असलेले राजीव सातव हे राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून येण्याची शक्यता कमी आहे.
 
तर काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या संध्या सव्वालाखे या तेली समाजाचे असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तेली समाजाचे असलेले वडेट्टीवार येण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचेच नाव आघाडीवर आहे. नाना पटोले हे सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत.