मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (15:25 IST)

नितेश राणेंना कोर्टाचा दणका, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Court rejects Nitesh Rane's bail plea
शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे मोठा झटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता उच्च न्यायालयात नितेश राणे आपला जामीन अर्ज दाखल करणार आहेत.
 
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.