बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जून 2018 (08:34 IST)

जावयाचा प्रताप, सासऱ्याच्या नाकाला घेतला चावा

लातूर जिल्ह्यातील भादा गावात मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या सासऱ्याच्या नाकाला जावयाने चावा घेतला. यात जावयाने चावा घेत नाकाचा तुकडाच पाडला आहे. संतोष यादव या जावयाने सासरे नागनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. याप्रकरणी शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संतोषविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
व्यवसायाने आचारी असलेला संतोष दारुच्या आहारी गेला आहे. त्याला तीन अपत्य आहेत. संतोष पत्नीला कायम मारहाण करतो. यामुळे कायम तणावाखाली राहणारी पत्नी लहान बाळाला घेऊन माहेरी आली. तिला नेण्यासाठी तो भादा या गावी आला. तेव्हाही संतोष दारुच्या नषेत होता. त्याने आल्या आल्या पत्नीला मारहाण सुरु केली. सासरे नागनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि या झटापटीत संतोषने नागनाथ यांच्या नाकाला कडकडून चावा घेतला. यात त्यांच्या नाकाचा शेंडा तुटला आहे.