शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (17:39 IST)

खंडणी खोर पत्रकारांना पोलिसांनी पकडले, महिला सरपंचाला देत होते त्रास

नांदेड येथील खंडणी मागितल्या प्रकरणी4 बोगस पत्रकारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ग्रामपंचायत कार्यालयाचा अपंग निधी का खर्च केला नाही? सरपंच महिला गावात न राहता परभणी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी का राहतात? असे प्रश्न विचारून ही बातमी ‘जनमत’ चॅनेलवर न दाखविण्यासाठी 10 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या घटनेने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.
 
ताडकळस पासून जवळच असलेल्या माखणी गावात घडला. मंगळवारी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एका महागड्या चारचाकी वाहनातून सुटा-बुटातील एक तरुण व सोबत सुशिक्षित असलेली तरुणी व अन्य एक जण गावात आले होते. येथील सरपंच कोण आहेत? असा प्रश्न विचारून मोबाईल नंबर घेतला. लगेच सरपंचाच्या पतीला फोन लावून ‘आम्हाला तुमच्या गावातील विकास कामांची माहिती पाहिजे’ असे सांगितले. गावातील विकास कामांची माहिती एका बंद खोलीत कॅमेऱ्यात कैद करून तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला आलेला अंपगाचा निधी का खर्च केला नाही? तसेच गावच्या सरपंच परभणी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी का राहतात? असे प्रश्न विचारून ही बातमी चॅनेलवर दाखवण्याची धमकी दिली. तसेच ही बातमी चँनलवर दाखवायची नसेल तर 10 हजार रुपयांचे पॉकेट कारचालकाकडे देऊन टाका असे सांगितले. या बोगस पत्रकारांच्या बोलण्यात एकवाक्यता नव्हती.  महिला सरपंचाचे पती अंकुशराव आवरगंड यांनी पैसे देतो परंतु परभणीला चला, असे त्यांना सांगितले. ताडकळस मार्गे परभणीला यावे लागत असल्याने ताडकळसला येताच अंकुश अवरगंड यांनी या चारही बोगस या चॅनलच्या पत्रकारांना थेट ताडकळस पोलीस ठाण्यात आणून झालेली सर्व माहिती पोलिसांना सांगितली. अखेर रात्री उशिरा अंकुश गणपतराव आवरगंड यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात आरोपी राजेश पुंडलिकराव जोंधळे (मराठवाडा ब्युरो चीफ, जनमत चॅनल), मनिषा बालाजी गंदलवार (रा:पेनुर ता.लोहा .जि. नांदेड,) विक्रम एकनाथराव वाघमारे (रा: बळीरामपुर एम.आय.डि.सी.नांदेड) शिवशंकर रमाकांत हिंगणे (रा. बसवेश्वर नगर सिडको नांदेड) यांच्या विरुद्ध कलम 385,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. बोगस पत्रकार अनेक अश्या लोकांना गाठत त्यांच्या कडून पैसे उकलत असतात अश्या लोकांना बळी न पडता पोलिसांना लगेच सांगितले पाहिजे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.