बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (14:27 IST)

फोटो शेअर करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका

amol mitkari
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनही महाविकास आघाडीने केले होते. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा ट्विटर एक फोटो शेअर करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. 
 
“राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलने करा. बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय”,अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. शिवाय पायात पायताण घालुन जर “शिवप्रतिमा” देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
अमोल मिटकरी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिवप्रतिमा देताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी पायाचील चपला काढलेल्या नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, या फोटोमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आहेत. त्यामुळे मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवही निशाणा साधला आहे.
 
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याआधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाना केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor