CSMT जगातील सर्वात आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांच्या यादीत सामील
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाने जगातील सर्वात आश्चर्यकारक स्टेशनांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. 'वंडर्सलिस्ट' या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली आहे. न्यू-यॉर्कच्या ग्रँड सेंट्रल टर्मिनलने या यादीमध्ये अव्वल क्रमांक मिळवलाय. मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. यावर्षीच 132 वर्षे पूर्ण झालेल्या सीएसएमटी स्थानकाहून दररोज तीन दशलक्ष प्रवासी येथून प्रवास करतात. वास्तूकलेचा अद्भूत नमूना असून यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं एकमेव स्थानक आहे अशा शब्दांमध्ये या संकेतस्थळाने सीएसएमटीचा गौरव केलाय.
जगातील 10 सर्वाधिक आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांची यादी या प्रकारे आहे...
1 – ग्रँड सेंट्रल टर्मिनल, न्यूयॉर्क
2 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
3 – सेंट पँक्रास इंटरनॅशनल, लंडन
4 – अटोचा स्टेशन, माद्रिद
5 – अँटवर्प सेंट्रल, अँटवर्प
6 – गारे डू नॉर्ड, पॅरिस
7 – सिरकेसी स्टेशन, इस्तांबुल
8 – सीएफएम रेल्वे स्टेशन, मापुटो
9 – कानाझ्वा स्टेशन, कानाझ्वा
10 – क्वालालंपूर रेल्वे स्टेशन, मलेशिया