गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (17:14 IST)

सिक्युरिटी प्रेसमधील कामगारांच्या महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ

नाशिकमध्ये असलेल्या सिक्युरिटी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नोटेसोबतच शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या नोटांची छपाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता नोट छपाईचे काम जोरात सुरु झाले आहे. दुसरीकडे या ठिकाणी कामावर असलेले कामगार नोट छपाईसाठी  मोठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत सरकारने कामगारांच्या महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 
                                      
देशात चलनामधून ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यांनतर आता नाशिकमध्ये असलेल्या सिक्युरिटी प्रेसमध्ये नोटांच्या छपाईचे काम जोरात सुरु झाले आहे. याठिकाणी ५०० रुपयांच्या ४० कोटी नव्या नोटा छापण्याचे काम सुरु असतांनाच आता १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांची छपाई सुरु करण्यात आली आहे. यासाठी सिक्युरिटी प्रेसमध्ये सुमारे २५०० कामगार काम करत आहेत. त्यांचे नोट छपाईचे काम तीन शिफ्टमध्ये सुरु आहे. तर प्रेसमध्ये दररोज सुमारे १५ ते १६ दशलक्ष नोटांची छपाई करण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात नोटांचा पुरवठा वाढवण्याची सरकारची योजना आहे. त्यामुळे सिक्युरिटी प्रेसमधील कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर कामाला लागले आहेत.