रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (15:05 IST)

पुरातत्व विभागाचा विठ्ठल मंदिर समितीला अहवाल सादर

vitthal pandharpur
पंढरपुरातील रुक्मिणी मातेच्या चरणावरचा वज्रलेप अवघ्या वर्ष-दीड वर्षांत निघू लागला आहे. दरम्यान पंढरपूर येथील पुरातन असलेल्या विठ्ठलची मूर्ती सुरक्षित आहे तर रुक्मिणी मातेच्या चरणावर पुन्हा वज्रलेप करावा लागणार आहे असे निरीक्षण पुरातत्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांनी नोंदविली आहे. पंढरपूर येथील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
 
विठ्ठलाचा गाभारा लहान असून येथे भाविकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात उष्णता आणि ह्युमिडिटी तयार होते . याचाही परिणाम मूर्तीवर होत असल्याने येथे टेम्परचर सेन्सर लावण्यात येणार आहे . मूर्तीसाठी साधारण 22 ते 25 डिग्रीपर्यंत तापमान राखणे आवश्यक असल्याने त्याच पद्धतीने भाविकांना मर्यादित संख्येत गाभाऱ्यात सोडण्यात येणार आहे . सध्या गाभाऱ्यातील तापमान 32 ते 35 डिग्री पर्यंत जात असल्याने या उष्णतेचा त्रास मूर्तीला होत असतो . याशिवाय गाभाऱ्यातील गरम हवा बाहेर जाण्यासाठी चौखांबी मध्ये व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे.
 
देवाच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे फळे आणि देशी विदेशी फुलांमुळे देखील मूर्तीला त्रास होत असल्याने ही सजावट गाभारा आणि चौखांबीच्या बाहेर करण्यावर विचार केला जात आहे . याबाबत देखील पुरातत्व विभागाच्या सूचनांचे पालन होणार आहे .
 
सध्या रुक्मिणीमातेच्या पायाची झालेली झीज पूर्ववत करण्यासाठी वज्रलेप देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुरातत्व विभागाकडून वेळ नक्की केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. रुक्मिणीच्या पायाची झीज झाली असताना हे समितीच्या निदर्शनास का आणून दिले नाही असा विषय बैठकीत होऊन याबाबत जबाबदार असणाऱ्या वर कारवाई करण्याचा निर्णय देखील बैठकीत झाला आहे.