Widgets Magazine
Widgets Magazine

आमचा विकास तर यांच्या बंदुका - फडणवीस यांची राष्ट्रवादीवर टीका

Last Modified गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (17:56 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील गुंडगिरीवर चांगलीच सडकून टीका केली आहे. आम्ही आमचा पक्ष आणि सरकार रोज विकासावर बोलतोय आणि प्रयत्न करतोय मात्र तर तिकडे एका पक्षाच्या कार्यक्रमात बंदुका निघतात, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत चांगलीच
Widgets Magazine
टीका केली आहे.


गुंदवली-कापूरबावडी-भांडुप संकुल भूमिगत जलबोगद्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.आमच्या दोघांच्या म्हणजेच युतीच्या कारभावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे मागील 20 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकत असल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युतीचं सरकार विकासाची कामं करत आहे.जनता आता बघतेय कोण काम करय आणि कोण बंदुका काढत आहे.


Widgets Magazine

यावर अधिक वाचा :