Widgets Magazine
Widgets Magazine

शेतकरी कर्जमाफी यादीत कोणतही गोंधळ नाही

गुरूवार, 6 जुलै 2017 (09:08 IST)

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणतीही गडबड नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तर मुंबई येथील जे शेतकरी आकडेवारी आहे ती सुद्धा योग्य आहे. त्यात कोणतीच चूक नाही असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील जी आकडेवारी होती त्यात मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा उल्लेख होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या आकडेवारी नुसार  मुंबई शहर जिल्ह्यात 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी मिळालेल्यांमध्ये मुंबई उपनगरापेक्षा मुंबई शहरातील शेतकरी जास्त आहेत. मुंबई शहरात नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री जरी स्पष्टीकरण करत असले तरीही जो पर्यंत हे शेतकरी कोण आणि कुठे शेती करतात ते जो पर्यंत समोर येत नाहीत तो पर्यंत हा वाद सुरूच राहणार आहे.
Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

‘अ‍ॅम्बुलन्स’चा सायरन आता १२० डेसिबल

रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णांना वेळेत उपयुक्त असलेल्या अ‍ॅम्बुलन्सचा सायरन आता १२० ...

news

हे तर फसवणीस सरकार आहे : अशोक चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. मुंबईत शेती होते ...

news

भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना मारहाण

मुंबई पालिकेच्या सभागृहातील जीएसटीनंतरचा धनादेश सुपूर्द करण्याचा शिवसेना आणि भाजपचा ...

news

पैशासाठी वृध्दांना करतात वाघाच्या हवाली

पीलिभीत- सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी घरातील वृद्ध व्यक्तींना जंगलातील वाघाच्या ...

Widgets Magazine