testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाच दिवसांचा आठवडा नाही

devendra fadnavis
Last Modified गुरूवार, 27 जुलै 2017 (11:08 IST)

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भातील कर्मचाऱ्या मागणीला सरकारने केराची टोपली दाखवली आहे. याबाबत सरकारने कोणतीही समिती स्थापन केलेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.

विधीमंडळात आमदार कपिल पाटील आणि अनंत गाडगीळ यांनी पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात लेखी प्रश्न विचारला. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी संघटना आणि शिक्षक भारती मागणीनुसार कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करण्याबाबत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याचं खरं आहे का? असा प्रश्न विचारला.

यावर प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात सरकारकडून कोणतीही समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे अहवालानुसार सरकारचा निर्णय काय हा प्रश्नच उद्भवत नाही.”यावर अधिक वाचा :