शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 मार्च 2018 (16:06 IST)

मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेचं निमंत्रण

संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीने राज्यात जोर धरला आहे. या साठी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघानं एल्गार मोर्चाचं आयोजन केले असून आझाद मैदानावर अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. हा मोर्चा जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान निघणार होता. मात्र, भारिपच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र त्यात आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आझाद मैदानावर आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे.  थोड्याच वेळात आंदोलन सुरुवात होणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आझाद मैदानात दाखल झाले आहेत. हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सी एस टी परिसरात मोठी गर्दी झाली आहे. संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणाऱ्या एल्गार मोर्चाला संभाजी ब्रिगेडने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ब्रिगेडचे पुणे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.